भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २९८ :
१.(व्यापार, इत्यादी करण्याचा अधिकार :
कोणताही व्यापार किंवा धंदा करणे आणि मालमत्ता संपादन करणे, धारण करणे व तिची विल्हेवाट करणे आणि कोणत्याही प्रयोजनाकरता संविदा करणे, हे संघराज्याच्या व प्रत्येक राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या कक्षेत येईल :
परंतु असे की,
(क) संघराज्याचा उक्त कार्यकारी अधिकार, जेथवर असा व्यापार किंवा धंदा किंवा असे प्रयोजन हे, ज्याबाबत संसदेला कायदे करता येतील अशांपैकी नसेल तेथवर, प्रत्येक राज्यात त्या राज्याने केलेल्या विधिविधानाच्या अधीन असेल ; आणि
(ख) प्रत्येक राज्याचा उक्त कार्यकारी अधिकार, जेथवर असा व्यापार किंवा धंदा किंवा असे प्रयोजन हे, ज्याबाबत राज्य विधानमंडळाला कायदे करता येतील अशांपैकी नसेल तेथवर, संसदेने केलेल्या विधिविधानाच्या अधीन असेल.)
————-
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २० द्वारे मूळ अनुच्छेद २९८ ऐवजी दाखल केला.