Constitution अनुच्छेद २९६ : सरकारजमा किंवा व्यपगत झाल्याने अथवा बेवारशी मालमत्ता म्हणून उपार्जित होणारी मालमत्ता :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २९६ :
सरकारजमा किंवा व्यपगत झाल्याने अथवा बेवारशी मालमत्ता म्हणून उपार्जित होणारी मालमत्ता :
यात यापुढे तरतूद केली आहे त्यास अधीन राहून, हे संविधान अंमलात आले नसते तर जी मालमत्ता सरकारजमा किंवा व्यपगत झाल्याने अथवा हक्कदार मालकाच्या अभावी बेवारशी मालमत्ता म्हणून, हिज मॅजेस्टीला, किंवा यथास्थिति, कोणत्याही भारतीय संस्थानाच्या अधिपतीला उपार्जित झाली असती अशी भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणतीही मालमत्ता, जर ती एखाद्या राज्यात स्थित असलेली मालमत्ता असेल तर, त्या राज्याच्या ठायी निहित होईल, आणि अन्य कोणत्याही बाबतीत, संघराज्याच्या ठायी निहित होईल :
परंतु असे की, अशा प्रकारे जर एखादी मालमता, हिज मॅजेस्टीला किंवा एखाद्या भारतीय संस्थानाच्या अधिपतीला ज्या दिनांकास
उपार्जित झाली असती त्या दिनांकास ती, भारत सरकारच्या किंवा एखाद्या राज्याच्या शासनाच्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली असेल तर, अशी कोणतीही मालमत्ता, ज्या प्रयोजनांकरता ती त्यावेळी वापरली गेली किंवा धारण केली गेली असेल, ती प्रयोजने संघराज्याची किंवा राज्याची असतील त्यानुसार, संघराज्याच्या किंवा त्या राज्याच्या ठायी निहित होईल.
स्पष्टीकरण :
या अनुच्छेदात अधिपती आणि भारतीय संस्थान या शब्दप्रयोगांना अनुच्छेद ३६३ मध्ये असलेलाच अर्थ आहे.

Leave a Reply