भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २९०-क :
१.(विवक्षित देवस्वम् निधींमध्ये वार्षिक भरणा :
दरवर्षी शेहेचाळीस लक्ष पन्नास हजार रुपयांची रक्कम, केरळ राज्याच्या एकत्रित निधीवर भारित करून ती त्या निधीतून त्रावणकोर देवस्वम् निधीस दिली जाईल ; आणि दरवर्षी तेरा लक्ष पन्नास हजार रुपयांची रक्कम २.(तामिळनाडू) राज्याच्या एकत्रित निधीवर भारित करून ती त्या निधीतून १ नोव्हेंबर १९५६ रोजी त्रावणकोर-कोचीन राज्यातून त्या राज्याकडे हस्तांतरित झालेल्या राज्य क्षेत्रांतील हिंदू देवालयांच्या आणि पवित्र स्थानाच्या देखभालीकरता त्या राज्यात स्थापन झालेल्या देवस्वम् निधीस दिली जाईल.)
———-
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम १९ द्वारे समाविष्ट केला.
२. मद्रास राज्य (नाव बदलणे) अधिनियम, १९६८ (१९६८ चा ५३) याच्या कलम ४ द्वारे मद्रास या शब्दाऐवजी दाखल केले (१४ जानेवारी १९६९ रोजी व तेव्हापासून).