भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २८९ :
राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय करआकारणीपासून सूट :
(१) राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय करआकारणीपासून सूट असेल.
(२) राज्य शासनाने किंवा त्याच्या वतीने चालविलेला कोणत्याही प्रकारचा व्यापार किंवा धंदा अथवा त्याच्याशी निगडित असलेले कोणतेही व्यवहार अथवा अशा व्यापाराच्या किंवा धंद्याच्या प्रयोजनार्थ वापरलेली किंवा ताब्यात असलेली कोणतीही मालमत्ता अथवा तिच्या संबंधात उपार्जित होणारी किंवा उद्भवणारी कोणतीही प्राप्ती यांच्याबाबत संसदेने कायद्याद्वारे जर काही मर्यादा घालून दिली तर तेवढ्या मर्यादेपर्यंत, संघराज्याला कोणताही कर बसवण्यास किंवा बसवणे प्राधिकृत करण्यास, खंड (१) मधील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही.
(३) खंड (२) मधील कोणतीही गोष्ट, संसद कायद्याद्वारे जो व्यापार किंवा धंदा किंवा त्यांचा वर्ग हा शासनाच्या सर्वसाधारण कार्यांना आनुषंगिक म्हणून घोषित करील, अशा कोणत्याही व्यापाराला किंवा धंद्याला अथवा व्यापार किंवा धंदा याच्या कोणत्याही वर्गाला लागू असणार नाही.