भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २८५ :
संघराज्याच्या मालमत्तेस राज्याच्या करआकारणीपासून सूट :
(१) राज्याने किंवा राज्यातील कोणत्याही प्राधिकरणाने बसविलेल्या सर्व करांपासून संघराज्याच्या मालमत्तेला, संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करील त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत सूट असेल.
(२) संघराज्याची कोणतीही मालमत्ता, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी ज्या करास पात्र होती किंवा पात्र म्हणून मानली जात होती असा कोणताही कर, अशा मालमत्तेवर एखाद्या राज्यात आकारला जाण्याचे चालू असेल तोवर, त्या राज्यातील कोणत्याही प्राधिकाऱ्यास अशा मालमत्तेवर तो कर आकारण्यास, संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत, खंड (१) मधील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही.