भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २८४ :
लोकसेवक आणि न्यायालये यांना मिळालेल्या वादपक्षकारांच्या ठेवी व इतर पैसे यांची अभिरक्षा :
(क) संघराज्याच्या किंवा एखाद्या राज्याच्या कारभाराच्या संबंधात नेमलेला कोणताही अधिकारी, या नात्याने कोणत्याही अधिकाऱ्यास, भारत सरकारने, किंवा यथास्थिति, राज्य शासनाने उभारलेल्या किंवा त्यास मिळालेला महसूल किंवा सार्वजनिक पैसा याव्यतिरिक्त अन्य स्वरूपात ; किंवा
(ख) भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयाकडे, कोणतेही काम, बाब, लेखा किंवा व्यक्ती यांच्या नावे, मिळालेल्या किंवा त्याकडे जमा केलेल्या सर्व पैशांचा भरणा, भारताच्या लोक लेख्यामध्ये, किंवा यथास्थिति, राज्याच्या लोक- लेख्यामध्ये केला जाईल.