Constitution अनुच्छेद २८३ : एकत्रित निधी, आकस्मिकता निधी आणि लोक लेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची अभिरक्षा, इत्यादी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २८३ :
एकत्रित निधी, आकस्मिकता निधी आणि लोक लेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची अभिरक्षा, इत्यादी :
(१) भारताचा एकत्रित निधी व भारताचा आकस्मिकता निधी यांची अभिरक्षा, अशा निधींमध्ये पैशांचा भरणा करणे, त्यामधून पैसे काढणे, निधीत जमा झालेल्यांहून अन्य अशा, भारत सरकारने किंवा त्याच्या वतीने स्वीकारलेल्या सार्वजनिक पैशाची अभिरक्षा, त्यांचा भारताच्या लोक लेख्याच्या खाती भरणा करणे व अशा खात्यामधून पैसे काढणे या आणि पूर्वोक्त बाबींशी निगडित किंवा त्यांना सहाय्यभूत अशा अन्य सर्व बाबी, संसदेने केलेल्या कायद्याद्वारे विनियमित होतील आणि त्यासंबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत राष्ट्रपतीने केलेल्या नियमांद्वारे विनियमित होतील.
(२) राज्याचा एकत्रित निधी व राज्याचा आकस्मिकता निधी यांची अभिरक्षा, अशा निधींमध्ये पैशांचा भरणा करणे, त्यामधून पैसे काढणे, निधीत जमा झालेल्यांहून अन्य अशा, राज्य शासनाने किंवा त्यांच्या वतीने स्वीकारलेल्या सार्वजनिक पैशांची अभिरक्षा, त्याचा राज्याच्या लोक लेख्याच्या खाती भरणा करणे व अशा खात्यामधून पैसे काढणे या आणि पूर्वोक्त बाबींशी निगडित किंवा त्यांना सहाय्यभूत अशा अन्य सर्व बाबी, राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्याद्वारे विनियमित होतील आणि त्यासंबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत, त्या राज्याच्या राज्यपालाने १.(***) केलेल्या नियमांद्वारे विनियमित होतील.
———
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे किंवा राजप्रमुखाने हा मजकूर गाळला.

Leave a Reply