भारताचे संविधान ( राज्यघटना )
संकीर्ण वित्तीय तरतुदी :
अनुच्छेद २८२ :
संघराज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलातून भागवण्याजोगा खर्च :
एखादे सार्वजनिक प्रयोजन, ज्याच्याबाबत संसदेला, किंवा यथास्थिति, राज्य विधानमंडळाला कायदा करता येईल अशाप्रकारचे नसले तरी, संघराज्य किंवा ते राज्य त्या प्रयोजनासाठी कोणतीही अनुदाने देऊ शकेल.