Constitution अनुच्छेद २७९ : निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २७९ :
निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना :
(१) या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदींमधील निव्वळ उत्पन्न याचा कोणत्याही कराच्या किंवा शुल्काच्या संबंधातील अर्थ, वसुलीचा खर्च वजा जाता राहिलेले उत्पन्न, असा आहे आणि त्या तरतुदींच्या प्रयोजनांकरता, कोणत्याही क्षेत्रातील किंवा क्षेत्राशी संबंधित असलेल्या कराचे किंवा शुल्काचे अथवा कोणत्याही कराच्या किंवा शुल्काच्या कोणत्याही भागाचे निव्वळ उत्पन्न, भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याच्याकडून सुनिश्चित व प्रमाणित केले जाईल आणि त्याचे प्रमाणपत्र अंतिम असेल.
(२) पूर्वोक्त तरतुदीला आणि या प्रकरणाच्या अन्य कोणत्याही व्यक्त तरतुदीला अधीन राहून, या भागाखाली कोणत्याही शुल्काचे किंवा कराचे उत्पन्न, कोणत्याही राज्याला नेमून देण्यात आले असेल, किंवा देता येईल अशा कोणत्याही बाबतीत, त्या उत्पन्नाची कशा रीतीने परिगणना करावयाची, कोणतीही प्रदाने कोणत्या वेळेपासून अथवा कोणत्या वेळी आणि कशा रीतीने करावयाची यासंबंधी, एक वित्तीय वर्ष व अन्य वित्तीय वर्ष यांच्यात समायोजने करण्यासंबंधी आणि अन्य कोणत्याही आनुषंगिक किंवा सहाय्यभूत बाबींसंबंधी, संसदेने केलेला कायदा किंवा राष्ट्रपतीचा आदेश याद्वारे तरतूद करता येईल.

Leave a Reply