Constitution अनुच्छेद २६७ : आकस्मिकता निधी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २६७ :
आकस्मिकता निधी :
(१) संसदेला कायद्याद्वारे अग्रधनाच्या स्वरूपात भारताचा आकस्मिकता निधी या नावाचा एक आकस्मिकता निधी स्थापन करता येईल व त्या निधीत, अशा कायद्याद्वारे निर्धारित केल्या जातील अशा रकमा वेळोवेळी भरल्या जातील आणि अनपेक्षित खर्च भागविण्यासाठी, अनुच्छेद ११५ किंवा ११६ अन्वये संसदेकडून कायद्याद्वारे असा खर्च प्राधिकृत होईतोपर्यंत, अशा निधीतून अग्रिमे देणे राष्ट्रपतीस शक्य व्हावे याकरता, उक्त निधी विनियोगासाठी त्याला उपलब्ध राहील.
(२) राज्य विधानमंडळाला कायद्याद्वारे अग्रधनाच्या स्वरूपात राज्याचा आकस्मिकता निधी या नावाचा एक आकस्मिकता निधी स्थापन करता येईल व अशा कायद्याद्वारे निर्धारित केल्या जातील अशा रकमा त्यात वेळोवेळी भरल्या जातील आणि अनपेक्षित खर्च भागविण्यासाठी अनुच्छेद २०५ किंवा २०६ अन्वये राज्य विधानमंडळाकडून कायद्याद्वारे असा खर्च प्राधिकृत होईतोपर्यंत, अशा निधीतून अग्रिमे देणे राज्यपालास १.(***) शक्य व्हावे याकरता, उक्त निधी विनियोगासाठी त्याला उपलब्ध राहील.
———-
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे किंवा राजप्रमुखास हे शब्द गाळले.

Leave a Reply