भारताचे संविधान ( राज्यघटना )
पाण्यासंबंधी तंटे :
अनुच्छेद २६२ :
आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदीखोऱ्यांतील पाण्यासंबंधीच्या तंट्यांचा अभिनिर्णय :
(१) संसदेला, कायद्याद्वारे कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या किंवा नदीखोऱ्यातील पाण्याचा वापर, वाटप किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या किंवा तक्रारीच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येईल.
(२) या संविधानात काहीही असले तरी, संसदेस, कायद्याद्वारे, खंड (१) मध्ये निर्देशिलेल्या केलेल्या अशा कोणत्याही तंट्याच्या किंवा तक्रारीच्या बाबतीत, सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही, अशी तरतूद करता येईल.
