भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २६० :
भारताबाहेरील राज्यक्षेत्रांसंबंधी संघराज्याची अधिकारिता :
भारत सरकारला, भारताच्या राज्यक्षेत्राचा भाग नसलेल्या कोणत्याही राज्यक्षेत्राच्या सरकारबरोबर करार करून त्याअन्वये अशा राज्यक्षेत्राच्या सरकारकडे निहित असलेली कोणतीही शासकीय, वैधानिक किंवा न्यायिक कार्ये हाती घेता येतील, पण, असा प्रत्येक करार, विदेशविषयक अधिकारितेच्या वापरासंबंधी त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यास अधीन असेल आणि त्याद्वारे नियंत्रित होईल.