भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २५८-क :
१.(संघराज्याकडे कार्ये सोपवण्याचा राज्यांचा अधिकार :
या संविधानात काहीही असले तरी, एखाद्या राज्याच्या राज्यपालाला, राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्ये, भारत सरकारच्या संमतीने, त्या सरकारकडे किंवा त्याच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त किंवा बिनशर्त सोपवता येतील.)
————-
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम १८ द्वारे समाविष्ट केला.