भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २५१ :
संसदेने अनुच्छेद २४९ आणि २५० अन्वये केलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे यांमधील विसंगती :
या संविधानान्वये राज्य विधानमंडळाला जो कायदा करण्याचा अधिकार आहे, असा कोणताही कायदा करण्याचा त्याच्या अधिकारावर, अनुच्छेद २४९ व २५० मधील कोणत्याही गोष्टीमुळे निर्बंध पडणार नाही, मात्र जर राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्याची कोणतीही तरतूद ही, उक्त अनुच्छेदांपैकी कोणत्याही अनुच्छेदाअन्वये जो कायदा करण्याचा संसदेला अधिकार आहे, अशा संसदीय कायद्याच्या कोणत्याही तरतुदीस प्रतिकूल असेल तर, संसदेने केलेला कायदा — मग तो राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्याच्या अगोदर पारित झालेला असो किंवा नंतर झालेला असो अभिभावी ठरेल, आणि राज्य विधानमंडळाने केलेला कायदा, प्रतिकूलतेच्या मर्यादेपुरता, मात्र संसदेने केलेला कायदा प्रभावी असेतोवरच, अंमलरहीत असेल.