Constitution अनुच्छेद २४८ : विधिविधानाचे अवशिष्ट अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४८ :
विधिविधानाचे अवशिष्ट अधिकार :
(१) १.(अनुच्छेद २४६क च्या अधीन राहून, संसदेला) समवर्ती सूची किंवा राज्य सूची यामध्ये नमूद न केलेल्या कोणत्याही बाबीसंबंधी कोणताही कायदा करण्याचा अनन्य अधिकार आहे.
(२) अशा अधिकारामध्ये, त्या दोहोंपैकी कोणत्याही सूचीत न उल्लेखिलेला कर बसवणारा कोणताही कायदा करण्याच्या अधिकाराचा समावेश असेल.
——–
१. संविधान (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम ३ द्वारा (१६-९-२०१६ पासून) संसदेला या मजकुराऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply