Constitution अनुच्छेद २४३ यन : विद्यमान कायदे पुढे चालू राहणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३ यन :
विद्यमान कायदे पुढे चालू राहणे :
या भागामध्ये काहीही असले तरीही, संविधान (सत्त्यान्नावी सुधारणा ) अधिनियम, २०११ याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी राज्यांमध्ये अमलात असलेल्या सहकारी संस्थांशी संबंधित अशा कोणत्याही कायद्यातील, या भागाच्या तरतुदींशी विसंगत असलेली कोणतीही तरतुद ही, सक्षम विधिमंडळाकडून किंवा इतर सक्षम प्राधिकरणाकडून सुधारित किंवा निरसित केली जाई पर्यंत किंवा अशा प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्ष पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आगोदर असेल तो पर्यंत अमलात असण्याचे चालू राहील.

Leave a Reply