भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३ यध :
संघराज्य क्षेत्रांना लागू असणे :
या भागाच्या तरतुदी संघ राज्य क्षेत्रांना लागू होतील आणि विधानसभा नसलेल्या एखाद्या संघ राज्य क्षेत्राला लागू करताना, राज्याच्या विधिमंडळाच्या संबंधीचे निर्देश हे, जणू काही अनुच्छेद २३९ अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या त्या संघराज्य क्षेत्राच्या प्रशासकासंबंधीचे निर्देश असल्याप्रमाणे लागू होतील :
परंतु असे की, राष्ट्रपती, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निर्देश देऊ शकेल की, या भागाच्या तरतुदी, त्या अधिसूचनेत तो विनिर्दिष्ट करील त्याप्रमाणे, कोणताही संघ राज्य क्षेत्राला किंवा त्याच्या कोणत्याही भागाला लागू होणार नाही.