Constitution अनुच्छेद २४३ यथ : अपराध व शास्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३ यथ :
अपराध व शास्ती :
१) राज्य विधान मंडळास, सहकारी संस्थेशी संबंधित अपराधाकरिता आणि अशा अपराधांच्या शास्तीकरता कायद्याद्वारे तरतुदी करता येतील.
२) राज्य विधान मंडळाने खंड (१) अन्वये केलेल्या कायद्यात, पुढील कृती व आकृतींचा अपराध म्हणून समावेश असेल-
क) सहकारी संस्थेने किंवा तिच्या अधिकाऱ्याने किंवा सदस्याने हेतू पुरस्सर खोटे विवरण पत्र करणे किंवा खोटी माहिती पुरविणे किंवा राज्य अधिनियमाच्या तरतुदीअन्वये या संबंधात प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने, कोणत्याही व्यक्तीकडून मागविलेली कोणतीही माहिती त्या कोणत्याही व्यक्तीने हेतुपुरस्सर ना पुरविणे;
ख) कोणत्याही व्यक्तीने हेतुपुरस्सर किंवा कोणत्याही वाजवी सबबीशिवाय, राज्य अधिनियमाच्या तरतुदीअन्वये काढलेले कोणतेही समन्स, मागणीपत्र किंवा कायदेशीर लेखी आदेश यांची अवज्ञा करणे;
ग) कोणत्याही नियोक्त्याने, सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून त्याने वजात केलेली रक्कम ज्या दिनांकास ती वजात केलेली असेल त्या दिनांकापासून १४ दिवसांच्या कालावधीत सहकारी सस्थेकडे भरणा करण्यात कोणत्याही कारणाशिवाय कसूर करणे ;
घ) सहकारी संस्थेचा अधिकारी किंवा परीरक्षक असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा परीरक्षकाने सहकारी संस्थेच्या मालकाची पुस्तके, लेखे, दस्तऐवज, अभिलेख, रोकड, प्रतिभूती व इतर मालमत्ता प्राधिकृत व्यक्तीच्या हवाली करण्यात हेतुपुरस्सर कसूर करणे; आणि
ङ) कोणत्याही व्यक्तीने मंडळाच्या सदस्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान किंवा निवडणुकीनंतर कोणत्याही भ्रष्ट आचरणाचा अवलंब करणे.

Leave a Reply