भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३ यढ :
सर्व सदस्य मंडळाची सभा बोलविणे :
राज्य विधान मंडळास, कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे कामकाज चालवण्यासंबंधी, वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत, प्रत्येक सहकारी संस्थेची, सर्व सदस्य मंडळाची वार्षिक सभा बोलवता येईल, अशा तरतुदी कायद्याद्वारे, करता येतील.