भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३ यड :
सहकारी संस्थेच्या लेख्यांची लेखापरीक्षा :
१) राज्य विधानमंडळास, सहकारी संस्थेकडून लेखे ठेवले जाण्याच्या संबंधात आणि प्रत्येक वित्तीय वर्षात किमान एकदा अशा लेख्यांची लेखापरीक्षा करण्याच्या संबंधात कायद्याद्वारे, तरतुदी करता येतील.
२) राज्य विधानमंडळ, सहकारी संस्थांच्या लेख्यांची लेखापरीक्षा करणाऱ्या संस्था यांची किमान अर्हता व अनुभव कायद्याद्वारे निर्धारित करील.
३) प्रत्येक सहकारी संस्था, त्या सहकारी संस्थेच्या सर्व सदस्य मंडळाने नियुक्त केलेल्या खंड (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या लेखापरीक्षकाकडून किंवा लेखा परीक्षा करणाऱ्या संस्थेकडून लेखापरिक्षा करुन घेईल :
परंतु असे कि, राज्य शासनाने किंवा या बाबतीत राज्य शासनाकडून प्राधिकृत करण्यात आलेल्या प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या नामिकेवरील लेखा परीक्षकाची किंवा लेखा परीक्षा करणाऱ्या संस्थेची नियुक्ती करण्यात येईल.
४) प्रत्येक सहकारी संस्थेच्या लेख्यांची, असे लेखे ज्या वित्तीय वर्षाशी संबंधित असतील ते वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी सहा महिन्यांच्या आत लेखा परीक्षा केली जाईल.
५) राज्य अधिनियमाद्वारे व्याख्या करण्यात येईल अशा शिखर सहकारी संस्थेच्या लेख्यांचा लेखा परीक्षा अहवाल, राज्य विधान मंडळात कायद्याद्वारे तरतूद करील अशा रीतीने, राज्य विधान मंडळापुढे ठेवण्यात येईल.