Constitution अनुच्छेद २४३-यच : विद्यमान कायदे व नगरपालिका अस्तित्वात राहणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-यच :
विद्यमान कायदे व नगरपालिका अस्तित्वात राहणे :
या भागामध्ये काहीही अंतर्भूत असले की, सविधान (चौऱ्याहत्तरावी सुधारणा) अधिनियम, १९९२ याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी राज्यामध्ये अंमलात असलेल्या, नगरपालिकांशी संबंधित अशा कोणत्याही कायद्यातील, या भागातील तरतुदींशी विसंगत असलेली कोणतीही तरतूद ही, सक्षम विधानमंडळाकडून किंवा, इतर सक्षम प्राधिकाऱ्याकडून सुधारित किंवा निरसित केली जाईपर्यंत, किंवा अशा प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्ष पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे अगोदरचे असेल तोपर्यंत, अंमलात असण्याचे चालू राहील :
परंतु असे की, अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व नगरपालिका, त्या राज्याच्या विधानसभेकडून किंवा त्या राज्याची विधानपरिषद असल्यास, त्या राज्याच्या विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहाकडून, तशा आशयाचा ठराव मंजूर करून त्याद्वारे, तत्पूर्वीच विसर्जित केलेल्या नसल्यास, त्यांचा कालावधी समाप्त होईपर्यंत अस्तित्वात राहतील.

Leave a Reply