भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-भ :
नगरपालिकांचा कर लादण्याचा अधिकार आणि नगरपालिकांचे निधी :
राज्य विधानमंडळ, कायद्याद्वारे, त्या कायद्यात विनिर्दिष्ट करण्यात येईल,
(क) अशा कार्यपद्धतीनुसार आणि अशा मर्यादांना अधीन राहून, असे कर, शुल्क, पथकर आणि फी आकारण्यास, वसूल करण्यास आणि विनियोजित करण्यास नगरपालिकांना प्राधिकार देऊ शकेल ;
(ख) अशा प्रयोजनांसाठी आणि अशा शर्तींना आणि मर्यादांना अधीन राहून, राज्य शासनाने आकारलेला आणि वसूल केलेला असा कर, शुल्क, पथकर आणि फी नगरपालिकेकडे नेमून देऊ शकेल ;
(ग) असे सहायक अनुदान राज्याच्या एकत्रित निधीतून नगरपालिकांना देण्याची तरतूद करू शकेल ; आणि
(घ) असा निधी, अनुक्रमे नगरपालिकांद्वारे किंवा नगरपालिकांच्यावतीने स्वीकारलेला सर्व पैसा जमाखाती टाकण्यासाठी आणि तसेच त्यातून तो काढून घेण्यासाठी स्थापन करण्याची तरतूद करू शकेल.