Constitution अनुच्छेद २४३-ब : नगरपालिका, इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-ब :
नगरपालिका, इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या :
या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्य विधानमंडळ, कायद्याद्वारे,
(क) नगरपालिकांना स्वराज्य संस्था म्हणून कामे पार पाडणे शक्य व्हावे यादृष्टीने आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार त्यांना देऊ शकेल आणि
(एक) आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय यासाठी योजना तयार करण्याच्या ;
(दोन) बाराव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या बाबींसंबंधातील कार्यांसह त्यांच्यावर सोपविण्यात आलेली कार्ये पार पाडणे व योजनांची अंमलबजावणी करण्याच्या, बाबतीत, या कायद्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तींना अधीन राहून, या नगरपालिकांना अधिकार व जबाबदाऱ्या सोपविण्याच्या तरतुदींचा अशा कायद्यामध्ये अंतर्भाव करु शकेल;
(ख) बाराव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या बाबींसंबंधातील जबाबदाऱ्यांसह त्यांना प्रदान करण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे शक्य व्हावे, यासाठी आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार समितीस देऊ शकेल.

Leave a Reply