Constitution अनुच्छेद २४३-ङ : पंचायतींचा कालावधी इत्यादी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-ङ :
पंचायतींचा कालावधी इत्यादी :
(१) प्रत्येक पंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, तिच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील, त्यापेक्षा अधिक काळ नाही.
(२) त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामधील कोणतीही सुधारणा, अशा सुधारणेच्या लगतपूर्वी कार्यरत असलेल्या कोणत्याही पातळीवरील कोणत्याही पंचायतीचा खंड (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेला कालावधी समाप्त होईपर्यंत तिचे विसर्जन करण्याकरिता कारणीभूत ठरणार नाही.
(३) एखादी पंचायत घटित करण्यासाठीची निवडणूक,—-
(क) खंड (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेला तिचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी ;
(ख) तिचे विसर्जन झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी ;
पूर्ण करण्यात येईल :
परंतु असे की, ज्या कालावधीसाठी विसर्जित पंचायत चालू राहिली असती तो उर्वरित कालावधी सहा महिन्यांपेक्षा कमी असेल त्या बाबतीत, अशा कालावधीसाठी पंचायत घटित करण्याकरिता या खंडान्वये कोणतीही निवडणूक घेण्याची आवश्यकता असणार नाही.
(४) एखाद्या पंचायतीचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी, तिचे विसर्जन झाल्यामुळे घटित करण्यात आलेली पंचायत ही, खंड (१) अन्वये ज्या कालावधीसाठी ती विसर्जित पच्ं ाायत, तिच े विसर्जन झाल े नसते तर अस्तित्वात राहिली असती, तेवढ्याच उर्वि रत कालावधीसाठी अस्तित्वात राहील.

Leave a Reply