Constitution अनुच्छेद २३९कख : सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास तरतूद :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २३९-कख :
१.(सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास तरतूद :
उपराज्यपालाकडील अहवाल आल्यावर किंवा अन्यथा, राष्ट्रपतीची जर अशी खात्री झाली की,—–
(क) अनुच्छेद २३९कक किंवा त्या अनुच्छेदानुसार करण्यात आलेला कोणताही कायदा याच्या तरतुदींनुसार राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्राचे प्रशासन चालवणे अशक्य झाले आहे, अशी परिस्थिती उद्भवली आहे; किंवा
(ख) राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्राच्या योग्य प्रशासनासाठी तसे करणे आवश्यक किंवा उचित आहे,
तर राष्ट्रपतीला, अनुच्छेद २३९ कक ची कोणतीही तरतूद किंवा त्या अनुच्छेदानुसार करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याच्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदी यांचे प्रवर्तन, अशा कायद्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीसाठी आणि अशा शर्तींना अधीन राहून, निलंबित करता येईल आणि अनुच्छेद २३९ व अनुच्छेद २३९कक याच्या तरतुदींनुसार राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या प्रशासनासाठी त्याला आवश्यक किंवा इष्ट वाटतील अशा आनुषंगिक व परिणामस्वरूप तरतुदी करता येतील.)
———–
१. संविधान (एकोणसत्तरावी सुधारणा) अधिनियम, १९९१ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला (१ फेब्रुवारी १९९२ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply