Constitution अनुच्छेद २३३ : जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
प्रकरण सहा :
दुय्यम न्यायालये :
अनुच्छेद २३३ :
जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती :
(१) कोणत्याही राज्याचा राज्यपाल, त्या राज्यातील जिल्हा न्यायाधीशांच्या पदांवर करावयाची व्यक्तींची नियुक्ती आणि जिल्हा न्यायाधीशांचे पदस्थापन व पदोन्नती या गोष्टी, अशा राज्यांच्या संबंधात अधिकारितेचा वापर करणाऱ्या उच्च न्यायालयाशी विचारविनियम करून करील.
(२) आधीपासून संघराज्याच्या किंवा राज्याच्या सेवेत नसलेली व्यक्ती, जर ती किमान सात वर्षे इतका काळ अधिवक्ता किंवा वकील असेल आणि उच्च न्यायालयाने नियुक्तीकरता तिची शिफारस केलेली असेल तरच, ती जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र होईल.

Leave a Reply