Constitution अनुच्छेद २० : अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २० :
अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण :
(१) जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही.
(२) एकाच अपराधाबद्दल ऐकापेक्षा अधिकवेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही.
(३) कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वत:विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही.

Leave a Reply