Constitution अनुच्छेद १ : संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग एक :
संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र :
अनुच्छेद १ :
संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र :
(१) इंडिया, अर्थात भारत, हा राज्यांचा संघ असेल.
१.((२) राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.)
(३) भारताचे राज्यक्षेत्र—-
(क) राज्यांची राज्यक्षेत्रे ;
२.((ख) पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेली संघ राज्यक्षेत्रे ; आणि)
(ग) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे,
मिळून बनलेले असेल.
——-
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २ द्वारे मूळ खंड (२) ऐवजी दाखल केला.
२. वरील अधिनियमाच्या कलम २ द्वारे मूळ उपखंड (ख) ऐवजी दाखल केला.

Leave a Reply