Constitution अनुच्छेद १९२ : सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १९२ :
१.(सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय :
(१) एखाद्या राज्य विधानमंडळाच्या सभागृहाचा एखादा सदस्य अनुच्छेद १९१ च्या खंड (१) मध्ये नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही कारणास्तव अपात्र झाला आहे किंवा कसे याबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास, तो प्रश्न राज्यपालाकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल.
(२) अशा कोणत्याही प्रश्नावर कोणताही निर्णय देण्यापूर्वी, राज्यपाल, निवडणूक आयोगाचे मत घेईल आणि अशा मतानुसार कृती करील.)
—————
१.अनुच्छेद १९२ हा संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम ३३ द्वारे (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून) सुधारण्यात आला व त्यानंतर संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम २५ द्वारे सुधारण्यात येऊन वरील स्वरूपात आला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply