भारताचे संविधान ( राज्यघटना )
कामकाज चालवणे :
अनुच्छेद १८८ :
सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :
राज्याच्या विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा प्रत्येक सदस्य, आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी, राज्यपालासमोर अथवा त्याने याबाबत नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर, तिसऱ्या अनुसूचीत या प्रयोजनार्थ दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करील.