Constitution अनुच्छेद १८३ : सभापतीचे आणि उपसभापतीचे पद रिक्त होणे व त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरून दूर करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १८३ :
सभापतीचे आणि उपसभापतीचे पद रिक्त होणे व त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरून दूर करणे :
विधानपरिषदेचा सभापती व उपसभापती म्हणून पद धारण करणाऱ्या सदस्यास—
(क) त्याचे विधानपरिषदेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर, आपले पद रिक्त करावे लागेल ;
(ख) असा सदस्य हा, सभापती असल्यास, उपसभापतीस आणि असा सदस्य हा, उपसभापती असल्यास, सभापतीस संबोधून, कोणत्याही वेळी स्वत:च्या सहीनिशी आपल्या पदाचा लेखी राजीनामा देता येईल; आणि
(ग) विधानपरिषदेच्या त्या वेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या विधानपरिषदेच्या ठरावाद्वारे त्याच्या पदावरून दूर करता येईल :
परंतु असे की, खंड (ग) च्या प्रयोजनार्थ, कोणताही ठराव, तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज, मांडला जाणार नाही.

Leave a Reply