भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १७९ :
अध्यक्षाचे व उपाध्यक्षाचे पद रिक्त होणे व त्या पदाचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे :
विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून पद धारण करणारा सदस्य–
(क) त्याचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर, आपले पद रिक्त करील;
(ख) असा सदस्य हा, अध्यक्ष असल्यास, उपाध्यक्षास आणि असा सदस्य हा, उपाध्यक्ष असल्यास, अध्यक्षास संबोधून कोणत्याही वेळी स्वत:च्या सहीनिशी, आपल्या पदाचा लेखी राजीनामा देऊ शकेल; आणि
(ग) विधानसभेच्या त्या वेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या विधानसभेच्या ठरावाद्वारे त्याच्या पदावरून दूर केला जाऊ शकेल :
परंतु असे की, खंड (ग) च्या प्रयोजनार्थ असणारा कोणताही ठराव, तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज मांडला जाणार नाही :
परंतु आणखी असे की, जेव्हा जेव्हा विधानसभा विसर्जित होईल तेव्हा तेव्हा, विसर्जनानंतर होणाऱ्या विधानसभेज्या पहिल्या सभेच्या लगतपूर्वीपर्यत अध्यक्ष आपले पद रिक्त करणार नाही.