भारताचे संविधान ( राज्यघटना )
राज्य विधानमंडळाचे अधिकारी :
अनुच्छेद १७८ :
विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष :
प्रत्येक राज्याची विधानसभा, शक्य होईल तितक्या लवकर, विधानसभेच्या दोन सदस्यांना अनुक्रमे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडील आणि अध्यक्षांचे किंवा उपाध्यक्षांचे पद रिक्त होईल तेव्हा तेव्हा, विधानसभा अन्य सदस्यास अध्यक्ष किंवा यथास्थिति, उपाध्यक्ष म्हणून निवडील.