Constitution अनुच्छेद १७६ : राज्यपालाचे विशेष अभिभाषण :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १७६ :
राज्यपालाचे विशेष अभिभाषण :
(१) १.(विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभी,) विधानसभेत, किंवा विधानपरिषद असलेल्या राज्याच्या बाबतीत, एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून राज्यपाल अभिभाषण करील आणि विधानमंडळास, त्याला अभिनिमंत्रित करण्याची कारणे सांगेल.
(२) अशा अभिभाषणात निर्देशिलेल्या बाबींच्या चर्चेकरता वेळ वाटून देण्यासाठी २.(***) सभागृहाच्या किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या कार्यपद्धतीचे विनियमन करणाऱ्या नियमांद्वारे तरतूद केली जाईल.
—————
१. संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम, १९५१ याच्या कलम ९ द्वारे प्रत्येक सत्राच्या याऐवजी दाखल केले.
२. संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम, १९५१ याच्या कलम ९ द्वारे आणि अशाच चर्चेला सभागृहाच्या अन्य कामकाजापेक्षा अग्रक्रम देण्यासाठी हे शब्द गाळले.

Leave a Reply