Constitution अनुच्छेद १७४ : राज्य विधानमंडळाची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १७४ :
१.(राज्य विधानमंडळाची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन :
(१) राज्यपाल, त्यास योग्य वाटेल अशा वेळी व ठिकाणी बैठक भरवण्यासाठी राज्य विधानमंडळाच्या सभागृहास किंवा दोहोंपैकी प्रत्येक सभागृहास वेळोवेळी अभिनिमंत्रित करील, पण त्याची एका सत्रातील अंतिम बैठक व पुढील सत्रातील त्याच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेला दिनांक यांच्या दरम्यान सहा महिन्यांचे अंतर असणार नाही.
(२) राज्यपालाला, वेळोवेळी—–
(क) सभागृहाची किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाची सत्रसमाप्ती करता येईल;
(ख) विधानसभा विसर्जित करता येईल.)
—————-
१. संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम, १९५१ याच्या कलम ८ द्वारे मूळ अनुच्छेदाऐवजी दाखल केला.

Leave a Reply