भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १७३ :
राज्य विधानमंडळाच्या सदस्यत्वाकरता अर्हता :
एखादी व्यक्ती,-
१.((क) ती भारताची नागरिक असल्याखेरीज, आणि निवडणूक आयोगाने याबाबत प्राधिकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर, त्या प्रयोजनाकरता तिसऱ्या अनुसूचित दिलेल्या नमुन्यानुसार तिने शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली स्वत:ची सही केलेली असल्याखेरीज ; )
(ख) विधानसभेतील जागेच्या बाबतीत, ती किमान पंचवीस वर्षे वयाची आणि विधानपरिषदेतील जागेच्या बाबतीत, ती किमान तीस वर्षे वयाची असल्याखेरीज ; आणि
(ग) संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये त्याबाबत विहित केल्या जातील अशा इतर अर्हता तिने धारण केलेल्या असल्याखेरीज, राज्य विधानमंडळामधील जागा भरण्याकरता निवडून जाण्यास पात्र होणार नाही.
————–
१. संविधान (सोळावी सुधारणा) अधिनियम, १९६३ याच्या कलम ४ द्वारे मूळ खंड (क) ऐवजी दाखल केला.