Constitution अनुच्छेद १६७ : राज्यपालास माहिती पुरवणे, इत्यादींबाबत मुख्यमंत्र्याची कर्तव्ये :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १६७ :
राज्यपालास माहिती पुरवणे, इत्यादींबाबत मुख्यमंत्र्याची कर्तव्ये :
(क) राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरिता आलेले सर्व प्रस्ताव राज्यपालास कळवणे ;
(ख) राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधी व विधिविधानाकरिता आलेल्या प्रस्तावासंबंधी राज्यपाल मागवील ती माहिती पुरवणे ; आणि
(ग) ज्या बाबीवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतलेला आहे, पण मंत्रिपरिषदेने जिचा विचार केलेला नाही अशी कोणतीही बाब, राज्यपालाने आवश्यक केल्यास, मंत्रिपरिषदेच्या विचारार्थ सादर करणे, हे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल.

Leave a Reply