भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १६१ :
क्षमा, इत्यादी करण्याचा आणि विवक्षित प्रकरणी शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार :
राज्याच्या राज्यपालास, कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या अशा बाबींशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरूद्ध केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला, शिक्षेबद्दल क्षमा करण्याचा, शिक्षेस तहकुबी देण्याचा, शिक्षेस स्थगिती देण्याचा किंवा शिक्षेत सूट देण्याचा अथवा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार असेल.