भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १५९ :
राज्यपालाने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :
प्रत्येक राज्यपाल व राज्यपालाची कार्ये पार पाडणारी प्रत्येक व्यक्ती, आपले पदग्रहण करण्यापूर्वी, त्या राज्याच्या संबंधात अधिकारितेचा वापर करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या समक्ष किंवा तो अनुपस्थित असेल तर, त्या न्यायालयाचा जो ज्येष्ठतम न्यायाधीश उपलब्ध असेल त्या न्यायाधीशाच्या समक्ष, पुढील नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करील, ती म्हणजे अशी—-
मी, क. ख. ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी, ………………. (राज्याचे नाव) चा राज्यपाल म्हणून आपल्या पदाचे कार्यपालन निष्ठापूर्वक करीन (किंवा मी ……………. च्या राज्यपालाची कार्ये निष्ठापूर्वक पार पाडीन) आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन, संरक्षण व प्रतिरक्षण करीन आणि मी स्वत:ला …………………(राज्याचे नाव) च्या जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेईन.