भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १५६ :
राज्यपालाचा पदावधी :
(१) राज्यपाल, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करील.
(२) राज्यपाल, राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा स्वत:च्या सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल.
(३) या अनुच्छेदाच्या पूर्वगामी तरतुदींना अधीन राहून, राज्यपाल, ज्या दिनांकास तो आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील :
परंतु असे की, राज्यपाल, त्याचा पदावधी संपला असला तरीही, त्याचा उत्तराधिकारी स्वत:चे पद ग्रहण करीपर्यंत पद धारण करणे चालू ठेवील.