Constitution अनुच्छेद १४९ : नियंत्रक व महा लेखापरीक्षक याची कर्तव्ये व अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १४९ :
नियंत्रक व महा लेखापरीक्षक याची कर्तव्ये व अधिकार :
नियंत्रक व महा लेखापरीक्षक हा, संघराज्य व राज्ये आणि अन्य कोणतेही प्राधिकारी किंवा निकाय यांच्या लेख्यांच्या संबंधात संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये विहित करण्यात येतील अशा कर्तव्यांचे पालन करील व अशा अधिकारांचा वापर करील आणि त्यासंबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत तो, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या व प्रांताच्या लेख्यांच्या संबंधात भारताच्या महा लेखापरीक्षकाकडे जी कर्तव्ये सोपविण्यात आली होती त्यांचे पालन व त्यास जे अधिकार वापरता येण्यासारखे होते त्यांचा वापर, अनुक्रमे संघराज्याच्या व राज्यांच्या लेख्यांच्या संबंधात करील.

Leave a Reply