भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १४७ :
अर्थ लावणे :
या प्रकरणात आणि भाग सहाच्या प्रकरण पाच यामध्ये, या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीच्या कोणत्याही कायदेविषयक सारभूत प्रश्नाच्या निर्देशांमध्ये, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९३५ (त्या अधिनियमात सुधारणा करणारी किंवा त्यास पूरक असलेली कोणतीही अधिनियमिती यासह) अथवा त्याअन्वये केलेली कोणतीही ऑर्डर इन कौन्सिल किंवा आदेश अथवा इंडियन इंडिपेंडन्स अॅक्ट, १९४७ किंवा त्याअन्वये केलेला कोणताही आदेश, याचा अर्थ लावण्यासंबंधीच्या कोणत्याही कायदेविषयक सारभूत प्रश्नाचे निर्देश समाविष्ट आहेत, असा त्या निर्देशांचा अन्वयार्थ लावला जाईल.