भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १३९ :
विवक्षित प्राधिलेख काढण्याच्या अधिकारांचे सर्वोच्च न्यायालयास प्रदान :
संसद, कायद्याद्वारे अनुच्छेद ३२ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनांखेरीज अन्य कोणत्याही प्रयोजनांकरता, निदेश, आदेश अथवा देहोपस्थिती (हेबिअस कॉर्पस), महादेश (मँडॅमस), प्रतिषेध (प्रोहिबिशन), क्वाधिकार (को वॉरंटो) व प्राकर्षण (सर्शिओराराय) या स्वरूपाच्या किंवा यांपैकी कोणत्याही प्राधिलेखांसह रिट प्राधिलेख काढण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास प्रदान करू शकेल.