Constitution अनुच्छेद १३८ : सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराची वृद्धी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १३८ :
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराची वृद्धी :
(१) सर्वोच्च न्यायालयास, संघ सूचीत असलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबींसंबंधी,संसद, कायद्याद्वारे प्रदान करील त्याप्रमाणे आणखी अधिकारिता आणि अधिकार असतील.
(२) कोणत्याही बाबींसंबंधी भारत सरकार आणि कोणत्याही राज्याचे शासन विशेष करारान्वये प्रदान करील अशी अधिकारिता व असे अधिकार यांचा वापर सर्वोच्च न्यायालयाने करावा, अशी संसदेने कायद्याद्वारे तरतूद केल्यास, सर्वोच्च न्यायालयास त्याप्रमाणे आणखी अधिकारिता व अधिकार असतील.

Leave a Reply