Constitution अनुच्छेद १२० : संसदेत वापरावयाची भाषा :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १२० :
संसदेत वापरावयाची भाषा :
(१) भाग सतरामध्ये काहीही असले तरी, मात्र अनुच्छेद ३४८ च्या तरतुदींना अधीन राहून संसदेतील कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल :
परंतु असे की, यथास्थिति, राज्यसभेचा सभापती किंवा लोकसभेचा अध्यक्ष, किंवा त्या नात्याने कार्य करणारी व्यक्ती, ज्या कोणत्याही सदस्यास हिंदीतून किंवा इंग्रजीतून आपले विचार नीटपणे व्यक्त करता येत नसतील त्याला आपल्या मातृभाषेत सभागृहाला संबोधून भाषण करण्याची अनुज्ञा देऊ शकेल.
(२) संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली नाही तर, या संविधानाच्या प्रारंभापासून पंधरा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर हा अनुच्छेद, त्यातील किंवा इंग्रजीतून हे शब्द जणू काही गाळलेले असावेत त्याप्रमाणे प्रभावी होईल.

Leave a Reply