भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ११ :
संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे :
या भागाच्या पूर्वगामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वविषयक अन्य सर्व बाबी यांच्यासंबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्यूनीकरण होणार नाही.