Constitution अनुच्छेद ११९ : वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ११९ :
वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन :
संसदेस, वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी, कोणत्याही वित्तीय बाबीच्या संबंधात, किंवा भारताच्या एकत्रित निधीतून पैशांचे विनियोजन करण्यासाठी आणलेल्या कोणत्याही विधेयकाच्या संबंधात संसदेच्या प्रत्येक सभागृहाची कार्यपद्धती आणि त्यातील कामकाजाचे चालन यांचे कायद्याद्वारे विनियमन करता येईल आणि याप्रमाणे केलेल्या कोणत्याही कायद्याची कोणतीही तरतूद, अनुच्छेद ११८ च्या खंड (१) अन्वये संसदेच्या एखाद्या सभागृहाने केलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा त्या अनुच्छेदाच्या खंड (२) अन्वये संसदेच्या संबंधात प्रभावी असलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा स्थायी आदेशाशी, विसंगत असेल तर व तेवढ्या मर्यादेपर्यंत, अशी तरतूद अभिभावी ठरेल.

Leave a Reply