भारताचे संविधान ( राज्यघटना )
सर्वसाधारण कार्यपद्धती :
अनुच्छेद ११८ :
कार्यपद्धतीचे नियम :
(१) संसदेच्या प्रत्येक सभागृहास या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, आपली कार्यपद्धती आणि आपले कामकाज चालविणे यांचे विनियमन करण्याकरता नियम करता येतील.
(२) खंड (१) अन्वये नियम केले जाईपर्यंत, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या लेजिस्लेचरबाबत अंमलात असलेले कार्यपद्धतीचे नियम व स्थायी आदेश हे, राज्यसभेचा सभापती, किंवा यथास्थिति, लोकसभेचा अध्यक्ष त्यात जे फेरबदल व अनुकूलने करील त्या फेरबदलांस व अनुकूलनांस अधीन राहून संसदेच्या संबंधात प्रभावी असतील.
(३) राष्ट्रपतीला, राज्यसभेचा सभापती आणि लोकसभेचा अध्यक्ष यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकी, आणि त्यांच्यामधील परस्पर संपर्क याबाबतच्या कार्यपद्धतीसंबंधी नियम करता येतील.
(४) दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीस, लोकसभेचा अध्यक्ष, किंवा त्याच्या अनुपस्थितीत खंड (३) अन्वये केलेल्या कार्यपद्धती, नियमांद्वारे निर्धारित केली जाईल अशी व्यक्ती, अध्यक्षस्थानी राहील.
———–
१. संविधान (बेचाळीसावी दुरुस्ती) अधिनियम, १९७६, च्या २२ (तारीख अधिसूचित केलेली नाही) द्वारे कंस आणि शब्द (सभागृहाची बैठक स्थापन करण्यासाठी गणपूर्ती सह) समाविष्ट केले आहेत. ही सुधारणा संविधान (चव्वेचाळीसावी सुधारणा) अधिनियम, १९७८, कलम ४५ द्वारे वगळण्यात आली (२०-६-१९७९ पासून).