Constitution अनुच्छेद १०६ : सदस्यांचे वेतन व भत्ते :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १०६ :
सदस्यांचे वेतन व भत्ते :
संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य हे, संसद कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील असे वेतन व भत्ते मिळण्यास व त्याबाबत त्याप्रमाणे तरतूद होईपर्यंत, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या कॉन्स्टिट्यूअंट असेंब्लीच्या सदस्यांच्या बाबतीत लागू असलेल्या अशा दरांनी व अशा शर्तींवर भत्ते मिळण्यास हक्कदार असतील.

Leave a Reply