Constitution अनुच्छदे ३३६ : विवक्षित सेवांमध्ये आंग्लभारतीय समाजाकरिता विशेष तरतूद :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छदे ३३६ :
विवक्षित सेवांमध्ये आंग्लभारतीय समाजाकरिता विशेष तरतूद :
(१) या संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या दोन वर्षांमध्ये, संघराज्याच्या रेल्वे, सीमाशुल्क, डाक व तार सेवांमधील पदांवर आंग्लभारतीय समाजातील व्यक्तींच्या नियुक्त्या, १५ ऑगस्ट १९४७ या दिवसाच्या लगतपूर्वी ज्या आधारे केल्या जात होत्या, त्याच आधारावर केल्या जातील.
दर दोन वर्षांच्या अनुवर्ती कालावधीमध्ये, उक्त समाजातील व्यक्तींकरिता उक्त सेवांमध्ये राखून ठेवलेल्या पदांची संख्या, लगतपूर्व दोन वर्षांच्या कालावधीत याप्रमाणे राखून ठेवलेल्या पदसंख्येपेक्षा शक्य तेथवर, दहा टक्क्यांनी कमी असेल :
परंतु असे की, या संविधानाच्या प्रारंभापासून दहा वर्षांच्या अखेरीस, अशाप्रकारे जागा राखून ठेवणे बंद होईल.
(२) जर आंग्लभारतीय समाजातील व्यक्ती, अन्य समाजातील व्यक्तींशी तुलना करता, गुणवतेच्या आधारे नियुक्तीस पात्र असल्याचे आढळून आले तर, खंड (१) अन्वये त्या समाजाकरिता राखून ठेवलेल्या पदांवर अशा व्यक्तींची नियुक्ती करण्यास त्या खंडातील कोणत्याही गोष्टीमुळे आडकाठी होणार नाही.

Leave a Reply